कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास ३१ ऑक्टोबरला ‘रेल्वे रोको’ करणार 

 मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी बच्चू कडू मुंबईकडे रवाना 

<p>कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास ३१ ऑक्टोबरला ‘रेल्वे रोको’ करणार </p>

नागपूर –  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला अनेकांनी जाहीर पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४१ मंत्र्यांसह बच्चू कडू यांना आज बैठकीला बोलवले आहे. या बैठकीसाठी सध्या बच्चू कडू मुंबईसाठी रवाना झाले आहेत. 

यावेळी बच्चू कडू यांनी, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास ३१ ऑक्टोबरला ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला  आहे.