नागपूरमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘या’ दिग्गज नेत्यांचा पाठिंबा
नागपूर – शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या चार दिवसांपासून बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर महामार्गावर आंदोलन सुरु आहे. काल आंदोलकांनी नागपूर- वर्धा महामार्ग रोखून चक्काजाम केला होता. यावर सरकारने बैठक घेवून चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यामुळे नागपूर महामार्गावर अद्याप शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. तसेच माजी खासदार राजू शेट्टी, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.