नागपूर महामार्गावर बच्चू कडूंनी केला चक्काजाम...

गेल्या 15 तासांहून अधिक काळ अनेक वाहने अडकून  

<p>नागपूर महामार्गावर बच्चू कडूंनी केला चक्काजाम...</p>

नागपूर – गेल्या तीन दिवसांपासून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्ती शिवाय त्वरित माफ करावे, सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह अन्य मागण्यांसाठी नागपूर महामार्गावर आंदोलन सुरु केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून मागण्यांवर तोडगा निघाला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. नागपूर महामार्गावर चक्काजाम केला आहे. नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे. त्यामुळे  गेल्या 15 तासांहून अधिक काळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडले आहेत. 
शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलनाची राज्य सरकारने कुठलीच दखल न घेतल्याने आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. पंजाबच्या धर्तीवर आज रेल्वे रोको करू, थेट दिल्लीपर्यंत त्याचे पडसाद उमटतील, यापूर्वी पाहिलेले देवाभाऊ आज शेतकऱ्यांविषयी काळजी घेताना दिसत नाही असा आरोप बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.