"शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू" – व्ही. बी. पाटील यांचा इशारा


 

<p>"शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू" – व्ही. बी. पाटील यांचा इशारा</p>

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज राज्यभरात तालुका व जिल्हा पातळीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन छेडण्यात आले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या नेतृत्वाखाली दोन तासांचे मुक आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये, स्थानिक तहसील कार्यालयासमोर तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी, “शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ न दिल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल.” असा सरकारला इशारा दिला.

शहराध्यक्ष आर के पोवार यांनी, हे सरकार पूर्णतः असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींना सरकार दुर्लक्ष करत असून, त्यांना देशोधडीला लावण्याचा कट रचला जात आहे. असा आरोप केला.

कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी, सध्याचे धोरण उद्योगपतीधार्जिणे असून शेतकरी वर्गाच्या पूर्णपणे विरोधात आहे.असे सांगितले.

या आंदोलनात बाजीराव खाडे, सुनील देसाई, महादेव पाटील, निरंजन कदम, गणेश जाधव, फिरोज सरगूर, पप्पू जाधव, रियाज कागदी यांच्यासह अनेक कार्यकर्ते  सहभागी होते.