हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था' व 'बी-वॉर्ड अन्याय निवारण समितीच्यावतीने धरणे आंदोलन

<p>हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था' व 'बी-वॉर्ड अन्याय निवारण समितीच्यावतीने धरणे आंदोलन</p>

कोल्हापूर -  सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यानं बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातील बिंदू चौकात 'हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था' आणि 'बी-वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन केले.

न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणे सरकारचे कर्तव्य असून राकेश किशोर यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात मुसाभाई शेख, राजेश पार्टे, प्रवीण मोहीने, अनिल कोळेकर, दीपक मेचर, सुनिल हंकारे, संजय मंगसुळे, आर. डी. पाटील, पद्माकर कापसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.