ऐतिहासिक कोल्हापूर पुरालेखागारबाबत विविध संघटनांनी केल्या 'या' मागण्या

<p>ऐतिहासिक कोल्हापूर पुरालेखागारबाबत विविध संघटनांनी केल्या 'या' मागण्या</p>

कोल्हापूर - ऐतिहासिक कोल्हापूर पुरालेखागार बाबत परिख पूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, युथ डेव्हलपमेंट फौंडेशन आदी संघटनांच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

 कोल्हापूर पुरालेखागारात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास संशोधकांच्या विशेष अभ्यास परिषदांचे आयोजन करण्यात यावे, पुरालेखागारच्या इमारतीच्या शेजारीच नूतन तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु असून या इमारतीजवळील चुकीचा पार्किंग आराखडा, प्रदुषण आणि परिसरातील अतिक्रमणांमुळे समस्या उद्भवल्यात, याबाबत महाराष्ट्र शासन आणि पुरालेख संचालनालय मुंबईचे चीफ आर्किटेक्ट यांनी तातडीने संयुक्त पाहणी दौरा करावा, कोल्हापूर पुरालेखागारच्या वहिवाटीतील रस्ता हेरिटेज स्ट्रीटचे प्रतिबिंब साकारणारे तसंच कमान आणि गेट ऐतिहासिक स्वरुपातील डिझाईनमध्ये साकारण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन कोल्हापूर पुरालेखागारच्या सहाय्यक संचालक दीपाली पाटील यांना देण्यात आले आहे. या मागण्यांची दखल घेतली नाही तर, एक दिवसीय अन्न-पाणी त्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी वैभव राजेभोसले, फिरोझ शेख, चंद्रकांत कांडेकरी, राहुल चौधरी, रियाज डांगे, जयसिंग बहादुरे, शुभम शिरहट्टी, सचिन शिरगांवे आदी उपस्थित होते.