कोल्हापूरात साजरा झाला खड्ड्यांचा वाढदिवस...

 

रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल शाहू सेनेचे अनोखे आंदोलन

<p>कोल्हापूरात साजरा झाला खड्ड्यांचा वाढदिवस...</p>

<p> </p>

कोल्हापूर - शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. याच्या निषेधार्थ शाहू सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या खड्डेमय रस्त्यावर अनोखे आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांभोवती रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली होती.

शाहू सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यातील खड्ड्यात बसून केक कापत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. या अनोख्या आंदोलनातून शाहू सेनेने महापालिकेचे रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. शाहू सेनेने गेल्या तीन वर्षांमध्ये रस्त्यातील खड्ड्यांबद्दल निदर्शने, शंभर मुख्य खड्ड्यांचे प्रदर्शन, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण अशी आंदोलन केली आहेत. परंतु  महापालिका प्रशासन कोल्हापूरकरांची खड्ड्यांमधून सुटका करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुनही कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत  आहे त्यामुळे कोल्हापूरची मोठ्या प्रमाणात बदनामी होत असल्याचे शाहू सेनेच्या उपाध्यक्षा चंदा बेलेकर यांनी म्हटले आहे.

या आंदोलनात चंद्रकांत कांडेकरी, फिरोज शेख, राहूल चौधरी, दाऊद शेख, ऋतुराज पाटील, करण कवठेकर, किरण कांबळे, साहिल पडवळे, अथर्व पाटील, अभिषेक परकाळे, प्रधान विखळकर, अजित पाटील, शशिकांत सोनुर्ले, अजय शिंगे, देवेंद्र माळी, अजित साळुंखे, वैजनाथ नाईक, शुभम किरूळकर आदींनी सहभाग घेतला होता.