पुरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची भाकपची मागणी

कोल्हापूर - भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. तहसीलदार स्वप्निल पवार यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
महायुती सरकारने पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं नाही तसंच त्याची अंमलबजावणी कशी होणार याची ठोस माहिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी विशेष अधिवेशनाची आवश्यकता असुन हे विशेष अधिवेशन तातडीने घ्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, दिनकर सूर्यवंशी, नामदेव पाटील, मारुती नलवडे, रघुनाथ माने आदी उपस्थित होते.