आज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे... 

<p>आज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे... </p>

कोल्हापूर – आपल्या विविध मागण्यांसाठी काल मध्यरात्रीपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. आज तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन  आणि सरकारने चर्चेची तयारी दर्शवल्याने वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी  संघटना संयुक्त कृती समितीने आज दुपारी संप मागे घेतला. त्यानुसार कृती समिती, कंपनी व्यवस्थापन आणि सरकार यांच्यामध्ये १४ आणि १५ ऑक्टोबरला बैठक होणार आहे.
 तिन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी पुनर्रचना आदेशाची अंमलबजावणी तातडीने थांबविण्यात यावी, यासह खाजगीकरण आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला होता.  ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले होते. मात्र राज्य सरकार बरोबर झालेल्या चर्चेनंतर १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चा होणार आहे. त्यामुळे आज दुपारपासून हा संप मागे घेण्यात आला असून तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.