आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी CITU तर्फे पालकमंत्र्यांना निवेदन

<p>आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी CITU तर्फे पालकमंत्र्यांना निवेदन</p>

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (CITU) तर्फे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. मानधन वेळेवर जमा न होणे, विनामोबदला ऑनलाईन डाटा एन्ट्रीसारखी अतिरिक्त कामे करवून घेणे, मूळ आरोग्य सेवेला बाधा, आर्थिक अडचणी आणि सन्मानजनक वागणूक न मिळणे यासारख्या गंभीर मुद्द्यांचा या निवेदनात समावेश आहे.

आशा व गटप्रवर्तक कार्यकर्त्या ग्रामीण व शहरी आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जातात. त्यांच्यावर वाढता कामाचा ताण, डिजिटल जबाबदाऱ्या आणि अपुऱ्या सुविधांचा ताण असतानाही त्या आपलं काम करत आहेत. शासनाने त्यांच्या कामाच्या मोबदल्यात न्याय, सन्मान आणि सुरक्षितता यांचा समावेश करणे आवश्यक आहे. यासंबंधीचे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले.

महत्त्वाच्या मागण्या -
१ थकीत मानधनाची तात्काळ भरपाई (राज्य व केंद्र शासनाकडून)
२ ऑनलाईन कामाची सक्ती थांबवावी
३ प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखे दरम्यान मानधन खात्यात जमा करावे
४ मूळ आरोग्य सेवेच्या बाहेरची कामे देऊ नयेत
५ गटप्रवर्तकांसाठी स्वतंत्र बैठकव्यवस्था व संगणक/लॅपटॉप द्यावेत
६ सेवानिवृत्तीच्या वेळी ₹५ लाख ग्रॅच्युइटी व ₹१०,००० मासिक पेन्शन
७ कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सन्मानजनक वागणूक मिळावी
८ कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे समायोजन करावे
९ वर्षभरात १५ सुट्ट्या व पगारी प्रसूती रजा मिळावी
१० २६ हजार किमान मासिक वेतन लागू करावे
११ २०२३ मधील २ हजार रुपये  दिवाळी बोनसची अंमलबजावणी करावी

दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी "दोन दिवसांत मानधन खात्यावर वर्ग होईल, असं आश्वासन आशा व गटप्रवर्तक प्रतिनिधींना दिलं.