दीपक बोराडे यांच्या उपोषणाला कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचा पाठिंबा

धनगर समाज आरक्षणाच्या प्रतिक्षेत

<p>दीपक बोराडे यांच्या उपोषणाला कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचा पाठिंबा</p>

कोल्हापूर - धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी १७ सप्टेंबरपासून जालन्यात आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा आठवा दिवस असूनही सरकारनं अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळं राज्यातील धनगर समाजात संतापाची लाट उसळलीय.

दीपक बोराडे यांच्या उपोषणाला कोल्हापूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. २०१४ साली बारामतीत धनगर समाजाचं आंदोलन सुरू असताना लाखोच्या जनसमुदायांसमोर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत धनगर समाजाचा राजकारण्यांनी केवळ मतापुरताच वापर केलाय. त्यामुळं भाजपची सत्ता आल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेऊ, असा शब्द दिला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा विसर पडल्यानं धनगर समाजातून नाराजी व्यक्त होतीय.

उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची तब्येत खालावत असल्यानं सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी कोल्हापूरातील धनगर समाजानं केलीय. निवेदन सादर करताना धनगर समाजाचे नेते बबन रानगे, संजय वाघमोडे, संजय पटकारे, शहाजी सिद, मेघना गावडे आदी उपस्थित होते.