कुंकूमार्चन सोहळ्याला विरोध, एकमुखी दत्त देवस्थानर्फे २२ सप्टेंबर पासून उपोषण
कुंकुमार्चन सोहळ्यावरून नूतन मराठी हायस्कूलची 'परीक्षा'

कोल्हापूर - कोल्हापुरातील मिरजकर तिकटी जवळील श्री एकमुखी दत्त देवस्थान आणि श्री एकमुखी दत्त आखाडा ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीनं दरवर्षी महाचंडी यज्ञ आणि महिलांसाठी भव्य कुंकुमार्चन सोहळा आयोजन करण्यात येतो. या कार्यक्रमाला नूतन मराठी हायस्कूलनं विरोध दर्शवलाय. याबाबत हायस्कूलच्या वतीनं अकरा सप्टेंबर रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आलाय. यावर श्री एकमुखी दत्त देवस्थान चे मठाधिपती संतोष गोसावी महाराज यांनी धार्मिक कार्यात याच वर्षी विरोध का असा सवाल उपस्थित कऔं याला जातीभेदाची किनार असल्याचा आरोप केलाय याविरोधात त्यांनी बावीस सप्टेंबर पासून मंदिरा समोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिलाय.
या उपोषणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हात सनातन बोर्डाची स्थापना करण्यात यावी. धार्मिक कार्यात विघ्न आणणान्यांवर तसंच चितावणीखोर स्टेटस, पोस्ट करणान्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा एकूण अकरा मागण्यांकडं प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणारय. दरम्यान या संपूर्ण प्रकाराबद्दल नूतन मराठी विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक धनंजय बेदरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ आल्यानं त्यांचं शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाला विरोध दर्शवला असून धार्मिक कार्याला विरोध नाही तसंच याला कोणताही जातीय रंग देण्याचा विद्यालयाचा हेतू नाही असं स्पष्ट केलंय.
या पत्रकार परिषदेला हिंदू महासभेचे राजेंद्र तोरस्कर, सुनील सामंत, अभिजीत राऊत, राहुल चव्हाण, विशाल भोंगाळे आदी उपस्थित होते.