हैदराबाद गॅझेट जीआर विरोधातील आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली...

मुंबई - 'त्या' शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे? उच्च न्यायालय हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात अॅड. विनीत धोत्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.
यावेळी न्यायालयाने याचिकेवर सवाल उपस्थित केले. ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे? असा सवाल उपस्थित करत जनहित याचिकेच्या ग्राह्यतेवरच उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासन निर्णयाने कोणी शेड्युल कास्टमधील कोणीही बाधित कसं झालं असा सवाल करत ही जनहित याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. तसंच याचिकाकर्त्याला रीट याचिका म्हणून सक्षम न्यायालयासमोर दाद मागण्याची न्यायालयाने मुभा दिली आहे.