विद्यापीठाच्या पोर्चमध्ये विद्यार्थ्यांचे 'झुणका भाकर' आंदोलन

शिवाजी विद्यापीठातील मेसच्या दर्जाहीन जेवणाविरोधात विद्यार्थी आक्रमक 

<p>विद्यापीठाच्या पोर्चमध्ये विद्यार्थ्यांचे 'झुणका भाकर' आंदोलन</p>

कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील मेसमध्ये विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. जेवणामध्ये साबणाचे तुकडे, घासण्याचे तुकडे, किडे, आळ्या आढळणे ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणून देवून देखील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे. याकडे  विद्यापीठ प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थींनी विद्यापीठाच्या पोर्चमध्ये 'झुणका भाकर' आंदोलन सुरु केले आहे. 

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या  या प्रकाराकडे विद्यापीठ प्रशासनाने अद्यापही कोणतीच कारवाई केली नाही. रविवारी संध्याकाळच्या जेवणात विद्यार्थ्यांना संपूर्ण जेवण न देता केवळ वरण-भात देण्यात येत आहे, याच्या निषेधार्थ आज विद्यार्थ्यांनी झुणका भाकर खाऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला.
 यावेळी शाहू सेनेने जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिरहट्टी यांनी, मेसचे मासिक बिल विद्यार्थ्यांकडून महिन्यापूर्वीच वसूल केले जाते.
प्रवेश घेताना डिपॉझिटच्या नावाखाली एक महिन्याचे आगाऊ बिल वसूल केले जाते. मेसला गैरहजर राहिल्यास विद्यार्थ्यांवर मनमानी दंड लावला जातो. या सर्व गोष्टींमुळे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 

यावेळी करण कवठेकर, अजय शिंगे, विवेक पोर्लेकर, अभिषेक परकाळे, सिद्धांत गणगे, हर्षवर्धन पाटील, ओमकार कुंभार, शुभम जाधव, कुणाल पांढरे, ऋतुराज पाटील, सूरज पाटील, ओंकार येवले, विश्वास गोरे यांच्यासह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.