गॅस दरवाढ आणि टंचाई विरोधात वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन...
कोल्हापूर - सध्या देशभर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी गॅसची टंचाई जाणवत असून काळाबाजारही वाढला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या घोषणांसह चुल पेटवून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत, सर्वसामान्यांना वेळेवर आणि योग्य दरात गॅस उपलब्ध करून द्यावा, गॅस टंचाई तात्काळ दूर करावी आणि काळा बाजारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, युवा शहराध्यक्ष अमित नागटिळे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, महासचिव दीपक कांबळे यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.