कोल्हापुरात मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवले; परिसरात खळबळ

<p>कोल्हापुरात मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवले; परिसरात खळबळ</p>

कोल्हापूर  : कोल्हापुरात एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने हात सोडून वाहन चालवत असताना सकाळी फिरायला आलेल्या वृद्ध महिलेवर ट्रॅक्टर चढवला. सुशीला बळवंत गुरव असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर विद्युत खांबाला धडकले, यात खांब मोडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.