पतंग काढताना विजेचा धक्का : उंचगावमध्ये तरुणाचा मृत्यू

<p>पतंग काढताना विजेचा धक्का : उंचगावमध्ये तरुणाचा मृत्यू</p>

उंचगाव — करवीर तालुक्यातील उंचगाव येथे आज सायंकाळी झालेल्या दुर्दैवी घटनेत पतंग काढताना विजेचा धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. सार्थक वळकुंजे असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करताना सार्थकला विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत आणखी एक युवक जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.