म्हालसवडे गावात पाण्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू

राधानगरी- करवीर तालुक्यातील म्हालसवडे या गावात हृदयद्रावक घटना घडली आहे. रंगराव रामचंद्र कांबळे (वय 55) आणि त्यांची पत्नी मनिषा रंगराव कांबळे (वय 45) यांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.घटनेचं नेमकं कारण अद्याप समजलं नसून, अपघात, आत्महत्या किंवा इतर कोणतीही शक्यता याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.