मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रा. कॉ. सुभाष जाधव यांचं ह्रदयविकारानं निधन

<p>मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रा. कॉ. सुभाष जाधव यांचं ह्रदयविकारानं निधन</p>

कोल्हापूर - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस प्रा. कॉ. सुभाष जाधव यांचं आज पहाटे ह्रदयविकारानं निधन झालं. त्यांच्या आकस्मिक जाण्यानं चळवळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालीय.

प्रा. कॉ. सुभाष जाधव यांचं अचानक निधन ही केवळ कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील चळवळींसाठी एक मोठी हानी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि कामगार चळवळींना दिशा लाभली होती. त्यांचा वैचारिक ठामपणा, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांशी असलेली बांधिलकी ही त्यांच्या कार्याची ओळख होती.