गोकुळ दूध संघ व बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. के. मोरे यांचे निधन

<p>गोकुळ दूध संघ व बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. के. मोरे यांचे निधन</p>

राधानगरी : गोकुळ दूध संघ व बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र कृष्णाजी उर्फ आर. के. मोरे (वय ५८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने राधानगरी तालुक्यासह सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

आर. के. मोरे हे सहकार चळवळीत सक्रिय होते. गोकुळ दूध संघ आणि बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व सभासदांच्या हितासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासात्मक उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सहकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.