आजरा-आंबोली मार्गावरील दुकान गाळ्यांना आग, कोट्यवधी रुपयांचं नुकसान
आजरा-आंबोली मार्गावरील पोलीस ठाण्याजवळील 'भाई-भाई चित्रमंदिर' समोरील दुकान गाळ्यांना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. पहाटेच्या सुमाराला लागलेल्या या आगीची स्थानिकांना लगेच माहिती मिळाली नाही. आगीनं रौद्ररुप धारण केल्यानंतर झालेल्या आवाजामुळं लोकांनी दुर्घटना स्थळ धाव घेतली. स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगी मध्ये काही दुकानं, कार रिपेअरींग गॅरेजसह सात चारचाकी जळून खाक झाल्या. या आगी मध्ये व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही.