दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानाने हवेत झेप घेताच इंजिन पडलं बंद...

<p>दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानाने हवेत झेप घेताच इंजिन पडलं बंद...</p>

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईनच्या सावळा गोंधळामुळे प्रवाशांना खूप काळ विमानतळावर थांबावे लागल्याने  नाहक त्रास सहन करावा लागला होता. यानंतर आज  एअर इंडियाच्या  विमानाने हवेत झेप घेताच इंजिन बंद पडल्याने आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे. त्यामुळे गोंधळ उडाला आहे.


दिल्लीवरून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग या विमानाने आज सकाळी दिल्लीवरून उड्डाण केलं होतं. या विमानातील एका इंजिनमध्ये ऑईल प्रेशर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर काही क्षणात हा ऑईल प्रेशर शून्यावर पोहोचला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान हवेतच पुन्हा दिल्लीकडे वळवण्यात आले आणि विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले असून प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप आहेत. या अनपेक्षित परिस्थितीमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने खेद व्यक्त केला आहे. तसेच या विमानाची आवश्यक ती तपासणी सुरू आहे.