​पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट, परिस्थिती पूर्वपदावर

<p>​पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट, परिस्थिती पूर्वपदावर</p>

कोल्हापूर - कोल्हापुरात पावसाचा जोर सध्या कमी झाला असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट होत आहे. आज दुपारी 12 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 40 फूट 1 इंच इतकी नोंदवली गेली. अजूनही 42 बंधारे पाण्याखाली आहेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बंधाऱ्यांची पाणी पातळी - बंधारा / पुल सध्याची पातळी इशारा पातळी धोका पातळी स्थिती-
➡️रुई बंधारा 71'3" 67' 70'  (धोका पातळीच्या वर)
➡️इचलकरंजी 68'7" 68' 71'  (इशारा ओलांडली)
➡️तेरवाड 65'0" 71' 73'  (सुरक्षित)
➡️शिरोळ 63'2" 74' 78'  (सुरक्षित)
➡️नृसिंहवाडी यादवपुल 61'2" 65' 68'  (सुरक्षित)
➡️सुर्वे बंधारा 38'1" - -  (सुरक्षित)