अखेर पंचगंगेने धोका पातळी गाठली...

<p>अखेर पंचगंगेने धोका पातळी गाठली...</p>

कोल्हापूर – धरण क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पातळी वाढली आहे. आज दुपारी १२ वाजता पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ नदीची पाणी पातळी ४३ फुट होती. नदीची धोका पातळी ४३ फुट असल्याने लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.