पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे...

कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळी वाढ होवू लागली आहे. सध्या नदीने इशारा पातळी ओलाडली असून नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरु झाली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फुट आहे.
आज दुपारी पंचगंगा नदी राजाराम बंधारा येथे ४० फुट २ इंच होती. जिल्ह्यातील ७८ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासात हातकणंगले- 13.1 मिमी, शिरोळ -9.5 मिमी, पन्हाळा- 29.1 मिमी, शाहुवाडी- 50 मिमी, राधानगरी- 63.9 मिमी, गगनबावडा- 109.3 मिमी, करवीर- 18.2 मिमी, कागल- 33.6 मिमी, गडहिंग्लज- 28 मिमी, भुदरगड- 43.4 मिमी, आजरा- 42.2 मिमी, चंदगड- 39.5 मिमी असा एकूण 32.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
धरणांची विसर्ग माहिती :-
राधानगरी - 5784 क्युसेक
दूधगंगा - 25000 क्युसेक
वारणा - 39663 क्युसेक
कोयना - 95300 क्युसेक
अलमट्टी - 250000 क्युसेक
हिप्परगी - 82800 क्युसेक