जिल्ह्यात एकूण सरासरी 65.5 मिमी पाऊस
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 151.3 मिमी पावसाची नोंद...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसानं जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे तुडुंब भरुन वाहतायत. आज सकाळी दहा वाजेपर्यंत नैसर्गिक आपत्ती जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या अहवालात जिल्ह्यात एकूण सरासरी 65.5 मिमी पाऊस पडला असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 151.3 मिमी पावसाची नोंद झालीय.
मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 151.3 मिमी., हातकणंगले- 50.8 मिमी, शिरोळ -34.4 मिमी, पन्हाळा- 70.9 मिमी, शाहुवाडी- 77 मिमी, राधानगरी- 91.8 मिमी, गगनबावडा- 151.3 मिमी, करवीर- 59.9 मिमी, कागल- 72 मिमी, गडहिंग्लज- 51.9 मिमी, भुदरगड- 92.2 मिमी, आजरा- 66.9 मिमी, चंदगड- 65.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झालीय.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरु आहेत. तर चार राज्यमार्ग, बारा प्रमुख जिल्हा मार्ग, इतर एक जिल्हा मार्ग आणि दहा ग्रामीण मार्ग या मार्गावरील बंधाऱ्यांवर, रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद आहेत.