अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्याबाबत अलमट्टी प्रशासनासोबत जिल्हाधिकारी संपर्कात

कोल्हापूर - जिल्हयात गेल्या दोन - तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा अलर्ट मोड असून पूरबाधित गावांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत धरण प्रशासनासोबत कोल्हापूर जिल्हा प्रशासन संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. सद्या अलमट्टीतून १ लाख ७५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पावसाचा जोर वाढला तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून, त्यासाठी नागरिकांचे स्थलांतर करावे लागल्यास त्यासाठी निवारा केंद्रांची तयारी करण्यात येतं असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.