तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू 

<p>तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू </p>

कोल्हापूर - तळकोकण व गोवा या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आज दुपारी एक च्या सुमारास दिली .


भुईबावडा घाट व करूळ घाट – जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनांमुळे हा मार्ग बंद आहे.
फोंडा घाट (राधानगरी तालुका) – फेजिवडे, देवगड-निपाणी रस्त्यावर पुराचे पाणी साचल्याने मार्ग बंद आहे.