महत्त्वाची सूचना – दूधगंगा धरणातील विसर्ग वाढ

<p>महत्त्वाची सूचना – दूधगंगा धरणातील विसर्ग वाढ</p>

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज मंगळवारी (दि.19) सकाळी 10:00 वाजता धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

 

नवीन विसर्ग विवरण:

सांडव्यावरून 18,500 घनफूट प्रतिसेकंद आणि विद्युत निर्मिती केंद्रातून 1,500 घनफूट प्रतिसेकंद (cusecs) विसर्ग होणार आहे. एकूण 20,000 घनफूट प्रतिसेकंद विसर्ग होणार असून या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी लक्षणीय वाढणार आहे. पावसाचे प्रमाण व धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात आणखी वाढ होऊ शकते.

 

 

तरी सर्व नदीकाठावरील गावकरी, ग्रामस्थ, शेतकरी यांनी नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रालगत असलेली संपत्ती, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, शेतीची उपकरणे, मालमत्ता नदीपासून दूर ठेवावीत, स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता चेतन माने यांनी केलंय.

 

राधानगरी धरण इशारा - 

आज मंगळवार (दि.19) पहाटे 3.20 वा. राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 2 पुन्हा उघडले आहे. एकूण सर्व 7 द्वारे (क्र.1,2,3,4, 5,6 व 7) उघडली आहेत. या सर्व स्वयंचलित दरवाज्यांमधून 10000 क्युसेक्स व BOT पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक्स असा एकूण 11500 क्युसेक्स इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. तरी नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.