मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूर – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर मांडूकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. दस्तुरी चौक (कळे) येथे बॅरिकेट्स लावून गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठवण्यात येत आहेत.
तसेच, कोल्हापूर – राजापूर हा राज्य मार्ग सुद्धा बाजारभोगाव या ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद आहे.
स्थानिक पोलीस यंत्रणा, वाहतूक विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी गरज नसल्यास प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असे आवाहन कळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी केलंय.