कृष्णा - वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

सांगली – सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासुन मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने धरणाच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे तर चांदोली धरण 85 भरले आहे.
सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फुटांवर गेली आहे. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे एका दिवसात नदीची पाणी पातळी तब्बल 6 फुटाने वाढली आहे. कृष्णा नदीवरील 5 बंधारे पाण्याखाली गेले असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.