‘या’ राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व पुतळ्यांवर 'सुरक्षा छत्र' बसवलं जाणार...
जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
लखनऊ – २०२७ मध्ये उत्तरप्रदेश राज्याची विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर दलित समाजाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांबाबत मोठी घोषणा केली आहे.
१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधत उत्तरप्रदेश राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व पुतळ्यांवर 'सुरक्षात्मक छत्र' बसवणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. महापुरुषांचा सन्मान आणि त्यांच्या स्मारकाचे संरक्षण ही सरकारची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.