बिहारमधील शीतला देवी मंदिरात चेंगराचेंगरीत...
8 महिलांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
पटना – बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील मगडा येथील प्रसिद्ध शीतला देवी मंदिरात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून 8 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.
शीतला देवी मंदिरात दर मंगळवारी पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. आज अचानक मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने गोंधळ उडाला. यावेळी लोक सैरावैरा धावू लागले. अचानक सुरू झालेल्या या गोंधळात अनेक महिला खाली पडल्या आणि गर्दीखाली चिरडल्या गेल्या. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर परिसरात प्रशासकीय यंत्रणा नव्हती. त्यामुळे काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.