केंद्र सरकारची संध्याकाळी पत्रकार परिषद...देशाची भूमिका करणार स्पष्ट 

<p>केंद्र सरकारची संध्याकाळी पत्रकार परिषद...देशाची भूमिका करणार स्पष्ट </p>

नवी दिल्ली – सध्या आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे देशात इंधन टंचाईसह अन्य सर्व गोष्टींची हळूहळू कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत असून  जनतेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. यासाठी आज सायंकाळी पाच वाजता केंद्र सरकार पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी आखाती देशातील युद्धावर सरकारची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर येत आहे.