कोल्हापूरच्या रियो बनसोडेंची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड 

<p>कोल्हापूरच्या रियो बनसोडेंची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड </p>

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रियो बनसोडेंची छत्तीसगडमध्ये होणाऱ्या सतरा वर्षाखाली SGFI राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्यांची ही निवड सलग चौथ्यांदा झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 


रिओने यापूर्वी हिमाचल प्रदेश, छत्तीसगड,पाँडिचेरी, मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय स्पर्धेत तसेच व्यावसायिक लीग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. रियो बनसोडे हा कोल्हापूरमधील शांतिनिकेतन  स्कूलमध्ये शिकत आहे. त्याला डॉ.डी. व्हाय. पाटील अकॅडमी शांतिनिकेतन स्कूलच्या संस्थापिका राजश्री काकडे, करण काकडे, मुख्याध्यापिका–जयश्री जाधव, क्रीडाशिक्षक –सचिन चौगुल, प्रशिक्षक–अमित दलाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बास्केटबॉल असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, उपाध्यक्ष–नितीन दळवाई, हितेश मेहता, आशुतोष खराडे केदार सुतार व राजू रायकर यांचे मार्गदर्शन लाभले.