शिवाजी विद्यापीठ कबड्डी संघाची अखिल भारतीय स्पर्धेकरिता निवड

कोल्हापूर – मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथे सुरु असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ संघाने डॉ. होमी भाभा विद्यापीठ संघावर विजय मिळवला आहे.
या विजयामुळे शिवाजी विद्यापीठ संघाची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अत्यंत चुरशीने झालेल्या या सामन्यामध्ये मध्यंतरापर्यंतचा स्कोर शिवाजी विद्यापीठ 14 व होमी भाभा विद्यापीठ 13 असा होता.
अंतिम पाच मिनिटांमध्ये सौरभ फगरे यांच्या चढाया व अवधूत आदित्य पवार यांनी केलेल्या पकडींच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाने हा सामना सहा गुणांनी जिंकला. संघाचे प्रशिक्षक डॉ देवेंद्र बिरनाळे, डॉ संजय पाटील यांचे संघाला मार्गदर्शन लाभले.