रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्यावतीने फुटबॉल टूर्नामेंट फूटसाल टू पाईंट झिरो या स्पर्धेचे आयोजन...

<p>रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्यावतीने फुटबॉल टूर्नामेंट फूटसाल टू पाईंट झिरो या स्पर्धेचे आयोजन...</p>

कोल्हापूर - रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने फुटबॉल टूर्नामेंट फूटसाल टू पाईंट झिरो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रेझी टाऊन टर्फ या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलीय याचे उद्घाटन माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये एकूण अठावीस संघ सहभागी झालेत. एकूण वीस मिनिटांच्या नॉक आउट प्रकारात हे सामने खेळवण्यात येणार आहेत.

यासाठी पहिलं बक्षीस पंचवीस हजार, दुसरं बक्षीस पंधरा हजार आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. याशिवाय बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट डिफेन्स, बेस्ट गोलकीपर यांना सुद्धा विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी डी वाय पी ग्रुप मुख्य प्रायोजक आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष अभिजीत भोसले, माजी अध्यक्ष विजय रेळेकर, रोट्रॅक्ट इव्हेंट चेअरमन विश्वजीत मोहिते पाटील, स्वरूप पाटील, अध्यक्ष आशुतोष परब, सचिव अभिषेक कोले, सुयश रेळेकर, केदार मोरे, अनिकेत सावंत, दिनेश आनेकर आदी उपस्थित होते.