खेलो इंडिया ऍथलीटमध्ये जिजाऊ पाटीलची सुवर्ण हॅटट्रिक...

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील जिजाऊ पाटील हिने खेलो इंडिया ऍथलीटच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय.
हिंगोली येथे झालेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर फॉइल फेन्सिंग स्पर्धेत तिने सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावून हॅटट्रिक साधली आहे. तसेच संभाजीनगर येथे झालेल्या कॅडेट राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धेत तिने वैयक्तिक सुवर्ण व टीम सुवर्ण पटकावत दुहेरी यश संपादन केले आहे. या कामगिरीच्या जोरावर जिजाऊची पांडिचेरी व उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सध्या ती पुण्यातील अक्षरनंदन शाळेत शिक्षण घेत आहे. सध्या ती अहमदाबादमधील विजयभारत स्पोर्ट्स येथे कोच विजयकुमार व भवानी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
या यशामध्ये तिला तिचे आजोबा माजी जिल्हा परिषद सदस्य पी.डी.पाटील आसगावकर, वडील जीवन पाटील, आई मनिषा पाटील, तसेच पाटील कुटुंबियांचे सहकार्य लाभले आहे.