धक्कादायक : आयपीएल खेळाडूंच्या 261 जर्सीं गेल्या चोरीला...

गुन्हा दाखल 

<p>धक्कादायक : आयपीएल खेळाडूंच्या 261 जर्सीं गेल्या चोरीला...</p>

मुंबई – क्रिकेट जगतात आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या नाहीत, त्या गोष्टी घडण्यास सुरुवात झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वानखेडे स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावरून बीसीसीआयच्या अधिकृत स्टोअरमधून आयपीएल खेळाडूंच्या एकूण 261 जर्सीं चोरीला गेल्याची घटना घडली आहे.  
या जर्सींची किंमत ६ लाख ५२  हजार रुपये आहे. या चोरी प्रकरणी सुरक्षा व्यवस्थापक फारुख असलम खान याच्याविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.