जलतरणपटू मंदार दिवसे यांना दोन सुवर्ण, एक रौप्य

वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२५ च्या स्पर्धेत मिळवलं यश 

<p>जलतरणपटू मंदार दिवसे यांना दोन सुवर्ण, एक रौप्य</p>

कोल्हापूर : अमेरिकेतील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२५ च्या स्पर्धेत कोल्हापूरचे जलतरणपटू मंदार दिवसे यांनी दोन सुवर्णपदके पटकावलीत. तिसऱ्या दिवशी ४०० मीटर फ्रीस्टाईल आणि ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले (पुरुष) प्रकारात ही पदके मिळाली आहेत. या स्पर्धेत दिवसे यांनी २ सुवर्ण व १ रौप्यपदकासह ३ पदके मिळविली आहेत. मंदार दिवसे हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ते बीएसएफच्या सेंट्रल अँक्वाटिक टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत. यापूर्वी कॅनडा (२०२३), चीन (२०१९) आणि अमेरिका (२०१७) येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.