क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला मैदानातील सेलिब्रेशन चांगलच भोवलं...गुन्हा दाखल
मुंबई – मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मैदानातील सेलिब्रेशन क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला चांगलाच भोवले आहे. एका वकिलाने त्याच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विजयानंतर हार्दिक पांड्या खांद्यावर तिरंगा घेऊन मैदानावर डान्स करत, धावत सेलिब्रेशन करत होता. तसेच त्याने खांद्यावर तिरंगा असताना प्रेयसी माहिका शर्मासह मंचावर झोपला. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्याने सेलिब्रेशन करताना तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.