अबूधाबी ओपन मास्टर्स गेम्समध्ये शिल्पा जोशींची सुवर्ण कामगिरी
नवी दिल्ली - अबूधाबी येथे पार पडलेल्या Open Masters Games Abu Dhabi 2026 या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शिल्पा दीपक जोशी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
टेबल टेनिस स्पर्धेत ५५ वर्षांवरील महिला गटात शिल्पा जोशी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले तर ४५ वर्षांवरील महिला दुहेरी गटात डॉ. अनघा जोशी यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या गेममध्ये जगभरातील सुमारे २५ हजार खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये ३८ विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असून ९२ हून अधिक देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.