...तोपर्यंत भारताने पाकशी संबंध ठेवू नयेत : हिंदूजनजागृती समितीची मागणी

<p>...तोपर्यंत भारताने पाकशी संबंध ठेवू नयेत : हिंदूजनजागृती समितीची मागणी</p>

कोल्हापूर - पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या 'आयसीसीवर्ल्ड कप' स्पर्धेमध्ये भारतासोबत सामना खेळण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र भारत सरकारने या प्रस्तावाला बळी पडू नये. जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा आतंकवाद थांबत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. क्रिकेटच्या मैदानात केवळ हस्तांदोलन टाळून पाकिस्तानचा निषेध करणे पुरेसे नाही तर क्रिकेटच नव्हे तर कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी संबंध ठेवू नयेत, अशी ठाम भूमिका भारत सरकारने घ्यावी, अशी मागणी हिंदुजनजागृती समितीने केली आहे.

 तहसीलदार हनुमंत म्हेत्रे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, शशिकांत बीडकर, दिलीप भिवटे, एस.बी. देवणे, अशोक गुरव, शिवानंद स्वामी, अजित सुस्वरे, दीपक कातवरे आदी उपस्थित होते.