सोळा वर्षाखालील शालेय बुद्धिबळ स्पर्धांचे कोल्हापुरात आयोजन

<p>सोळा वर्षाखालील शालेय बुद्धिबळ स्पर्धांचे कोल्हापुरात आयोजन</p>

कोल्हापूर : चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने ६४ स्क्वेअर चेस क्लबच्या वतीने सोळा वर्षाखालील शालेय मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता अयोध्या टॉवर, पाचवा मजला (हॉल), दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे होणार आहेत.

युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेसचे कॅप्टन उत्तम पाटील, प्रो ॲक्टिव्ह अबॅकस, श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जसवंत फूड्स व भारत डेअरी यांचे या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे.

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने, जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार एकूण सात फेऱ्यांत पार पडणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यास रोख १,००० रुपये व सुवर्णपदक, उपविजेत्यास रोख ७०० रुपये व रौप्यपदक, तर तृतीय क्रमांकास रोख ५०० रुपये व कास्यपदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 

मुख्य दहा बक्षिसांव्यतिरिक्त विविध गटांसाठी ३३ उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे.

इच्छुक बुद्धिबळपटूंनी नोंदणीसाठी

मानस महाडेश्वर – ९६८९५७०३९६

आर्यन पाटील – ९४२३९३४४७८

यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.