'या' प्रसिद्ध  बॅडमिंटनपटूची निवृत्तीची घोषणा 

<p>'या' प्रसिद्ध  बॅडमिंटनपटूची निवृत्तीची घोषणा </p>

मुंबई – भारताची बॅडमिंटनपटू सानिया नेहवालने निवृत्तीचा मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत तिने तिच्या कामगिरीतून देशासाठी इतिहास रचत खेलरत्न, पद्मश्री, पद्मभूषण असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
सानिया नेहवालने आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे कि,  'मी दोन वर्षांपूर्वी खेळणे सोडले. मला वाटले की मी माझ्या स्वतःच्या अटींवर खेळायला सुरुवात केली आहे आणि माझ्या स्वतःच्या अटींवर निवृत्त होईन, म्हणून ते जाहीर करण्याची गरज नव्हती'.
रियो 2016 ऑलिम्पिकमध्ये सानिया नेहवालच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतरही तिने 2017 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिकले. परंतु  गुडघ्याच्या सततच्या समस्यामुळे तिच्या खेळात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे 2024 मध्ये सानियाने खुलासा केला होता की, तिला गुडघ्यांचा आर्थराइटिस असून तिचे कार्टिलेज पूर्णपणे घासले आहेत. त्यामुळे सर्वोच्च स्पर्धांमध्ये खेळणे जवळजवळ अशक्य झाले आहे.