माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव
कोल्हापूर - शहराला पुढं घेऊन जाण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी एकजुटीनं काम करू, असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते
दसरा दिवाळी यासह अन्य सणात स्वच्छता कर्मचारी कर्तव्य बजावतात. याच सेवाभावी वृत्तीचा गौरव म्हणून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका वनिता देठे यांच्या उपस्थितीत आज फुलेवाडी रिंगरोडवरील सत्याईनगर इथं स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, कोल्हापूर शहराच्या विकासात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं. भविष्यात आपण सर्वजण मिळून कोल्हापूर शहराला आणखी स्वच्छ, सुंदर ठेवू. असं आवाहन त्यांनी केलं माजी आमदार पाटील यांनी देठे कुटुंबाच्या सामाजिक योगदानाचंही विशेष कौतुक केलं. यावेळी, आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांची कमतरता, वर्क-ऑन कॉल प्रणाली, तसंच टिपर नियोजनातील अडचणी यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमास डॉ. अशोक देठे, अभिजीत देठे, अमित देठे, राहुल सडोलीकर, तानाजी बोडके, साहिल साठे यांसह नागरिक उपस्थित होते.