टपाल विभागातील दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खूर्चीवरून वाद, पंतप्रधान मोदींसमोरच घडला प्रकार 

<p>टपाल विभागातील दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खूर्चीवरून वाद, पंतप्रधान मोदींसमोरच घडला प्रकार </p>

नागपुरातील १७ व्या रोजगार मेळाव्यात टपाल विभागातील दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये व्यासपीठावरच खुर्चीवरून वाद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांच्या देखत घडलेल्या या अनपेक्षित प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका अधिकाऱ्याची बदली दक्षिण भारतातील शहरात झाली होती, मात्र त्यांनी अजून नवीन ठिकाणी रुजू न होता नागपूरमध्येच कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान, त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेल्या दुसऱ्या अधिकारीही तिथं उपस्थित होत्या. त्यामुळे दोघी एकाच खुर्चीसाठी भिडल्या,दोघींत धक्काबुक्की झाली. हा सर्व प्रकार पंतप्रधान मोदी व नितीन गडकरी यांच्या समोरच घडला.त्यामुळे प्रशासनातील शिस्तीवर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.