दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी एसटीच्या जादा गाड्या...

<p>दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी एसटीच्या जादा गाड्या...</p>

कोल्हापूर - आज दीपावली सणाचा मुख्य दिवस असला तरी वसु बारसपासून हा सण सुरु झाला आहे. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने शहरात राहणारे अनेक जण या सणासाठी आपल्या गावी जात असतात तर दिवाळीच्या सुट्टीत अनेक जण देवदर्शना बरोबरच पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. त्यासाठी एसटीने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या कोल्हापूर विभागाने पुणे, सोलापूर, मुंबई, सोलापूर, अक्कलकोट, गणपतीपुळे, चंदगड या आणि अन्य लांब पल्ल्यांच्या मार्गावर जादा गाड्यांची सोय केलीय.