टीम पावनगडने दिवाळीचा पहिला दिवा लावला पावनगडावर...

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीमध्ये मदत करणाऱ्या स्वराज्यातील अनेक दुर्गाची दुरवस्था झालीय. या दुर्गांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील तरुण पुढे येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवछत्रपतींनी उभारलेल्या पावनगडाच्या संवर्धनासाठी आणि पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील तरुण टीम पावनगडच्या माध्यमातून कार्यरत आहेत. टीम पावनगड दुर्गसंवर्धना बरोबरच गंडावर विविध सण साजरे करत गड जागता ठेवण्याचा प्रयत्न करत असते.
गेल्या सहा वर्षांपासून टीम पावनगडचे कार्यकर्ते दिवाळीचा पहिला दिवा येथे प्रज्वलीत करतात. यावर्षी सुध्दा गड पूजन करुन पावनगडावरील मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता करुन तेथे दीप लावण्यात आले. स्वराज्यातील गडकोटांच्या साक्षीने दीपावली साजरी करत टीम पावनगडचे दुर्गसेवक दिवाळीनंतर दुर्गसंवर्धनाचे काम हाती घेतात. त्यांचा हा नित्यनेम सर्वच तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.