बहुजन क्रांती सामाजिक संघटनेकडून वृषाली पाटील हिचा सत्कार

कोल्हापूर - चंदगड तालुक्यातील पोरेवाडी येथील कन्या वृषाली पाटील हिची स्पर्धा परीक्षेद्वारे समाजकल्याण निरीक्षक या पदावर निवड झाली आहे. या निवडीबद्दल बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नांदवडे गावचे सरपंच राजेंद्रकुमार कांबळे, कोरज कुरतनवाडी गंधर्वगडचे सरपंच अनंत कांबळे, शिरगावचे माजी सरपंच राजू कांबळे, संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे, संदीप यादव, संतोष कांबळे, प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे आणि बहुजन संघटक पी. डी. सरोदे, यांच्यासह बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.